Advertisement

अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी आयपीएस अनमोल मित्तल

प्रजापत्र | Tuesday, 03/11/2026
बातमी शेअर करा

राज्य शासनाच्या गृहविभागाने राज्यातील पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. या प्रशासकीय फेरबदलानुसार अंबाजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयपीएस अधिकारी अनमोल मित्तल यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.

 

अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झालेले आयपीएस अनमोल मित्तल हे यापूर्वी ठाणे (ग्रामीण) येथे याच पदावर आपली सेवा बजावत होते. तेथील अनुभवानंतर आता त्यांच्याकडे अंबाजोगाई विभागातील कायदा व सुव्यवस्थेची महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.

 

अंबाजोगाईच्या विद्यमान अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांची नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. नागपूर येथील 'अमली पदार्थ विरोधी अभियाना'च्या (Anti-Narcotics) अधीक्षकपदी त्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या जागी रिक्त झालेल्या पदावर मित्तल यांची वर्णी लागली आहे.

Advertisement

Advertisement