बीड-मागील तारखेतील ५०० रुपयांचा बॉण्ड ३५०० हजारांना विक्री करणाऱ्या अंकुश पाचपोतेला एसीबीच्या पथकाने शनिवारी (दि.१७) रंगेहात पकडले आहे. गेवराईच्या तहसील कार्यालयात अंकुश पाचपोते बॉण्ड विक्रेते म्हणून काम करत आहेत.तक्रारदार याला मागील तारखेत बॉण्ड हवा असल्याने ५०० रुपयांच्या बॉण्डसाठी त्याने ३५०० हजारांची मागणी केली होती.याची तक्रार बीडच्या एसीबीकडे आल्यानंतर त्यांनी गेवराईच्या तहसील कार्यालयाजवळ सापळा रचून ही कारवाई केली आहे.दरम्यान एसीबीच्या मागच्या काही दिवसांत कारवायांचा वेग वाढल्याने लाचखोरांची धाबे दणाणले आहेत.अंकुश पाचपोतेला बीडच्या कार्यालयात आणण्यात आल्याची माहिती एसीबीचे डीवायएसपी सोपान चित्तमपल्ले यांनी दिली आहे.
बातमी शेअर करा

