Advertisement

विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यु

प्रजापत्र | Saturday, 26/09/2026
बातमी शेअर करा

 परळी वैजनाथ दि.२६ (प्रतिनिधी):गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तालुक्यातील कौठळी येथील एका वीस वर्षीय युवकाचा  पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार (दि.२५) रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

   परळी तालुक्यातील कौठळी येथील नदीपात्रात गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.आदिनाथ भाऊराव जाधव (वय २०) असे मयत युवकाचे असून परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देत उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement