Advertisement

बसस्थानकातून दागिने चोरणारी महिला ताब्यात

प्रजापत्र | Saturday, 12/09/2026
बातमी शेअर करा

  बीड दि.१२(प्रतिनिधी):पाटोदा बसस्थानक परिसरात महिलेच्या बॅगेतील सोने,रोख रक्कम चोरणाऱ्या महिलेला स्थानिक गुन्हे शाखेने पथकाने गुरुवार (दि.१०)रोजी  ताब्यात घेऊन तिच्याकडून १३ लाख ९७ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
      पाटोदा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी सोजर सुरेश भोसले (वय ४५),रा. पारनेर, ता. पाटोदा जि. बीड ही चोरीचे सोने विक्री करण्याच्या उद्देशाने चुंबळी फाटा येथे थांबली असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने चुंबळी फाटा येथे कारवाई करून तिला ताब्यात घेत तिच्याकडून ४ तोळे ४ ग्रॅम सोने व दहा हजार रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. यापूर्वी हस्तगत केलेल्या मुद्देमालासह गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण ८ तोळे ४ ग्रॅम सोने व रोख रक्कम असा एकूण  १३ लाख ९७ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत,अपर पोलीस अधीक्षक समीर शेख व उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित खुळे,पोनि शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि शेखर औटे,पोह अशोक दुबाले,सोमनाथ गायकवाड,बाळासाहेब सानप,आनंद मस्के,स्वाती मुंढे,श्री.नागरगोजे,पोअं अशफाक सय्यद,मनोज परजणे,अश्विनकुमार सुरवसे व चापोअं सिद्धार्थ मांजरे यांनी केली.

Advertisement

Advertisement