Advertisement

परळीत मध्यरात्री फोडले दुकान

प्रजापत्र | Thursday, 10/09/2026
बातमी शेअर करा

  परळी वैजनाथ दि.१० (प्रतीनिधी): शहरातील मोंढा मार्केट परिसरातील दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून पाच लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना बुधवार (दि.९) रोजी मध्यरात्री घडली असून चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

  मिळालेल्या माहितीनुसार,परळी शहरातील मोंढा मार्केट येथील अजय कलेक्शनच्या दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानात शिरल्यानंतर चोरट्यांनी थेट गल्ल्यावर डल्ला मारत त्यातील पाच लाख रुपयांची रोकड लंपास बुधवार (दि.९) रोजी मध्यरात्री केली आणि घटनास्थळावरून पोबारा केला. सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला.घटनेची माहिती मिळताच दुकानातील व्यावसायिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला.त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू केली. तसेच दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली जात आहे. चोरीतील नेमकी रक्कम आणि इतर मुद्देमालाबाबत पोलिस तपासानंतर अधिक माहिती समोर येणार आहे.या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

Advertisement

Advertisement