शिरूर कासार दि.9(प्रतिनिधी):तालुक्यातील रायमोह येथे जुगार अड्यावर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या पथकाने मंगळवार (दि.8) रोजी रात्री कारवाई केली असून 7 लाख 60 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सात जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
बीड शहरासह ग्रामीण भागातील अवैध धंद्यांवर कारवाई सुरू असतानाच
शिरूर कासार तालुक्यातील रायमोह परिसरात शिरूर रोडवर नवीन बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी तिरट नावाचा जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या पथकाला मिळाली या माहितीच्या आधारे मंगळवार (दि.8) रोजी रात्री उशिरा कारवाई करत जुगार खेळणाऱ्या सात जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, चारचाकी वाहने असा एकूण 7 लाख 60 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अपर पोलीस अधीक्षक समीर शेख उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत खुळे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय लोंढे,योगेश निर्धार यांनी केली.

