गेवराई दि.१३-रब्बी हंगामातील पिके ऐन भरात असतानाच, आघाडी सरकारच्या विद्युत विभागाने कोणतीच पूर्व सूचना न देताच शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असताना आ.लक्ष्मण पवार यांनी शनिवारी (दि.१३) दुपारी याबाबत महावितरण कार्यालयाचे येऊन अधिकाऱ्यांची बैठक घेत पूर्व सूचना न देता खंडित केलेला विद्युत पुरवठा सुरळीत करा अशी विनंती केली.मात्र प्रशासनाने अडमुठे धोरण ठेवून याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने आ.लक्ष्मण पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट महावितरण कार्यालयाच्या दारातच ठिय्या मांडत आमरण उपोषण सुरू केले आहे.आंदोलनाला बसण्यापूर्वी आ.पवार यांनी महावितरणकडे १० दिवसांचा अवधी मागितला होता मात्र त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
आघाडी सरकार हे फक्त भाजपा पक्षाच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांकडून सक्तीची वसूली करत असल्याचा गंभीर आरोप आ. पवार यांनी केला आहे. तर आ. लक्ष्मण पवार यांनी उपोषण सुरू करताच चार दिवसापूर्वी बंद केलेले गावठाण फिड्डर महावितरण विभागाने सुरू केले आहे. मात्र जो पर्यंत शेती पंपाचा विद्युत पुरवठा पूर्णपणे सुरळीत होत नाही, तोपर्यंत आपण विद्युत कंपनीच्या कार्यालय परिसरातून उठणार नाही, अशी ठाम भूमिका घेत येथील आ.लक्ष्मण पवार यांनी घेतली आहे.
बातमी शेअर करा