Advertisement

 राहुल गांधी जंतर-मंतरच्या दिशेने रवाना

प्रजापत्र | Tuesday, 21/07/2026
बातमी शेअर करा

दिल्ली : नीट पेपरफुटीप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीने केलेलं आंदोलनाची देशभर चर्चा सुरू आहे. गावा-गावांत,सोशल मीडियावर या आंदोलनाला प्रचंड समर्थन मिळतंय. काल संसद मोर्चादरम्यान झालेला हिंसाचारही अवघ्या देशाने पाहिला, त्यामुळे या आंदोलनाला अधिक धार आली. दरम्यान, हा मोर्चा आजही निघणार असल्याचं अभिजीत दिपके यांनी म्हटलंय. सुरक्षा दलांनी काल आंदोलकांवर निष्ठूर लाठीमार केला, यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. त्यामुळे आंदोलक अधिक पेटून उठले आहेत. आजही देशभरातून समर्थक दिल्लीत दाखल होत आहेत. काल झालेल्या हिंसाचारप्रकरणी काही आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तर, आज जंतर-मंतरवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि ज्येष्ठ नेते शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. 

Advertisement

Advertisement