Advertisement

 रेल्वे ट्रॅकवर आढळला मृतदेह  

प्रजापत्र | Tuesday, 21/07/2026
बातमी शेअर करा

परळी दि.२१ (प्रतिनिधी): शहरातील शक्तीकुंज वसाहत परिसरातील रेल्वे ट्रॅकवर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला तर शक्तीकुंज वसाहतीत मानवी पायाचा तुटलेला भाग आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आणि त्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. 
    रेल्वे पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता, मृतदेहाचा एक पाय गायब असल्याचे निदर्शनास आले. यानंतर शक्तीकुंज वसाहतीत सापडलेला तुटलेला पाय आणि रेल्वे रुळावरील मृतदेह यांचा संबंध असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार, रेल्वे रुळाजवळील मृतदेहाचा तुटलेला पाय भटक्या कुत्र्यांनी ओढत शक्तीकुंज वसाहतीत आणला असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, रेल्वे रुळावर आढळलेल्या मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. मृताची ओळख पटविण्याचे काम रेल्वे पोलीस करीत असून, मृत्यूचे नेमके कारण आणि संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे.या संपूर्ण घटनेमुळे परळी शहरात मोठी खळबळ उडाली असून, रेल्वे पोलीस सर्व बाबींचा सखोल तपास करीत आहेत. प्राथमिक माहितीवरून कुत्र्यांनी मानवी अवयव वसाहतीत आणल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असली, तरी अंतिम निष्कर्ष तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

 

Advertisement

Advertisement