Advertisement

अवैध गुटख्याच्या साठ्यावर कारवाई 

प्रजापत्र | Thursday, 16/07/2026
बातमी शेअर करा

बीड दि.१६(प्रतिनिधी): शहरातील मोहम्मदिया कॉलनी,मोमीनपुरा येथील एक घरात अवैध गुटखा विक्रीसाठी ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच बुधवार (दि.१५) रोजी रात्री कारवाई करत १,०४,८४० गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
       अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे बुधवार (दि.१५) रोजी सायंकाळी ६.१५ वाजता मोहम्मदिया कॉलनी येथे एका घरात गुटखा विक्रीसाठी ठेवली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली असता त्या ठिकाणी कारवाई केली.यावेळी संशयित शहबाज अब्दुलरजाक मोमीन हा मोमीनपुरा भागात गुटख्याच्या दोन गोण्या घेऊन उभा असल्याचे दिसून आले. मात्र पोलिसांना पाहताच त्याने गोण्या जागीच टाकून घराच्या मागील दरवाज्यातून पलायन केले. पंचांसमक्ष गोण्यांची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा-१०००, विमल पान मसाला, के.एन.-०१ जाफराणी जर्दा, रॉयल २२० तंबाखू, रॉयली ७१७ टोबॅको आणि V-1 टोबॅको आदी विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आला. पोलिसांनी एकूण १,०४,८४०  किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून शहबाज अब्दुलरजाक मोमीन, रा. मोहम्मदिया कॉलनी, मोमीनपुरा, बीड याच्याविरुद्ध पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम,पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि शेखर औटी,पो. ह.अशोक दुबाले,गोविंद राख,अंकुश वरपे,महिला पो. ह.स्वाती मुंडे,बबन सलगर, मनोज परजणे, अशफाक सय्यद ,सुनील राठोड यांनी केली.

 

Advertisement

Advertisement