शिरूर कासार दि.१४ (प्रतिनिधी):तालुक्यातील मानूर शिवारातील शेतात रोडच्या बाजूला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवार (दि.११) रोजी भरदिवसा घडली असून चोरट्यांविरुद्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर कासार तालुक्यात चोरी,घरफोडी अश्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून धोंडीराम पांडुरंग महानोर (वय ४२) रा.मानूर टाकळी ता.पाथर्डी जि.आहिल्यानगर यांनी मानूर शिवारातील शेरी नावाच्या शेतात रोडच्या बाजूला लावलेली हिरो कंपनीची काळ्या रंगाची एचएफ डिलक्स दुचाकी क्र.एमएच.१६ बी.एस. ८२३९ हिचे अज्ञात चोरट्यांनी हॅण्डल लॉक तोडून शनिवार (दि.११) रोजी दुपारी १:३० ते सायंकाळी ५:३० च्या सुमारास लंपास केली असून अंदाजे ३०,००० रुपयांचे नुकसान झाल्याप्रकरणी धोंडीराम महानोर यांच्या फिर्यादीवरून शिरूर कासार पोलीस ठाण्यात रविवार (दि.१२) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्री.नागरगोजे हे करत आहेत.

बातमी शेअर करा
