जालना दि.१३ - जालन्याहून बुलडाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. मारुती सुझुकी ब्रीजा (एमएच २२, एएम २७०१) ही गाडी विहिरीत कोसळली आहे. चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचं सांगण्यात येत आहे. जामवाडी शिवारातील युवराज धाब्यासमोर हा धक्कादायक प्रकार घडला. सायंकाळी ६.३० ते पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातात दोन जण ठार झाले असून एका मृतदेहाच्या खिशातील आधार कार्डवरुन त्याची ओळख पटली आहे.
अब्दुल मन्नान शेख सगीर (रा. बीड) असं मृत व्यक्तीचं नाव असून बीडमधील सागर फॅब्रीकेशन या प्रसिद्ध दुकानाचे ते मालक होते, अशी माहिती समोर आली आहे. दुसऱ्या मयताचे नाव अझहर कुरैशी असं आहे.
दरम्यान, काठोकाठ भरलेल्या विहिरीत ही गाडी पडल्यामुळे जालना पोलिसांना बचावात अडथळे निर्माण झाले होते, यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होतं, अशी माहिती पोलीस निरीक्षक यशवंत बागुल यांनी दिली आहे.
बातमी शेअर करा