Advertisement

रिक्षातून एक लाख रुपये लंपास 

प्रजापत्र | Thursday, 09/07/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.९(प्रतिनिधी):शहरातील बार्शी रोडवरील राजलक्ष्मी मेडिकल समोरून अज्ञात चोरट्याने रिक्षात ठेवलेली पैशाची बॅग लंपास केल्याची घटना मंगळवार (दि.७)रोजी घडली असून १ लाखांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा  करण्यात आला आहे.
     बीड शहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून माणिक दत्तात्रय रांजवण (वय ३६) रा.आहेर वडगाव ता.जि.बीड हे रिक्षाने प्रवास करत असताना शहरातील बार्शी रोडवरील राजलक्ष्मी मेडिकल समोरून १ लाख रुपये ठेवलेली पैशाची बॅग,टिफिन बॅग मंगळवार (दि.७) रोजी  ०८:१० च्या सुमारास अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली.माणिक रांजवण यांच्या फिर्यादीवरून बुधवार (दि.८)रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा करण्यात आला असून पुढील तपास श्री.उबाळे करत आहेत.

Advertisement

Advertisement