बीड-पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येनं पुण्यात खळबळ उडाली आहे. या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणात आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचं नाव असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. यावर पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रेमसंबंधातून पुण्यातील तरुणीने आत्महत्या केल्याचे आरोप करण्यात येत आहेत, असा प्रश्न विचारला असता अजित पवारांनी, 'आत्महत्या झाल्यानंतर त्याची चौकशी पोलीस करत असतातच. या प्रकरणातही चौकशी होईल. चौकशीनंतर सत्य बाहेर येईलच,' असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, 'आता काही पक्षांना दुसरं काही काम नसल्यानं असे आरोप कराताहेत,' असा टोलाही विरोधी पक्षाला हाणला आहे.
बातमी शेअर करा