गेवराई दि.२९(प्रतिनिधी): तालुक्यातील उमापूर येथील सूरज बिअर बार रेस्टॉरंटमध्ये मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल ५ ते ६ लाखांची वाईन लंपास केल्याची घटना घडली असून चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
गेवराई तालुक्यातील उमापूर सूरज बिअर बार रेस्टॉरंटमध्ये गुरुवार (दि.२८)रोजी मध्यरात्री चोरट्यांनी पाठीमागून प्रवेश करत खिडकी तोडली, शटर उचकटले आणि गोडाऊनमधील वाईनच्या बॉक्सवर हात साफ केला. एवढेच नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही फोडण्यात आले. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही याच हॉटेलमध्ये चोरी होऊन तब्बल १० लाखांचा माल चोरीला गेला होता.दुसऱ्यांदा एकाच हॉटेलवर चोरी होत असल्याने पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. उमापूर व चकलांबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बातमी शेअर करा
