परळी वैजनाथ दि.२३(प्रतीनिधी):शहरातील आपना चौक परिसरात एका १८ वर्षीय तरुणीचा माझ्याशी लग्न कर म्हणत विनयभंग केल्याची घटना शुक्रवार (दि.२२) र्रोजी घडली असून या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, परळी शहरातील आपना चौक परिसरात एका १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवार (दि.२२) र्रोजी घडली असून आरोपी अम्रु शेख रा. आपना चौक, रौफ कॉलनी, परळी याने एका तरुणीला अडवून “माझ्याशी लग्न कर, अन्यथा तुला पळवून नेईन” अशी धमकी दिली. तसेच तिचा हात पकडून ओढत विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४ व ७८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पो.ह. जाधव हे करीत आहेत.

बातमी शेअर करा
