Advertisement

 मजुराने गळफास घेत संपवले जीवन                                          

प्रजापत्र | Monday, 23/03/2026
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ दि.२३(प्रतीनिधी ): पैशाच्या कारणावरून वारंवार जातीय शिवीगाळ व दमदाटी सहन करावी लागल्याने नैराश्यात जाऊन एका मजुराने गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना पौळ पिंपरी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    अधिक  माहितीनुसार, मृत कुंडलिक पिराजी वैराळ रा. पौळ पिंपरी, ता. परळी वैजनाथ यांनी शुक्रवार (दि.२०) रोजी रात्री ११ वा. ते दि. २१ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान आरोपी राम महादेव पौळ यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुताच्या दोरीने गळफास घेऊन जीवन संपविले.या घटनेप्रकरणी मृताची पत्नी शांताबाई कुंडलिक वैराळ (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राम महादेव पौळ (रा. पौळ पिंपरी) याच्याविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपी हा पैशाच्या वादातून वारंवार जातीय शिवीगाळ करून दमदाटी करत होता.
सततच्या मानसिक छळाला कंटाळून व नैराश्यात जाऊन कुंडलिक वैराळ यांनी जीवन संपविल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदरील घटनेची नोंद रविवार (दि.२२) रोजी करण्यात आली असून, पुढील तपास माजलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके हे करीत आहेत. 

Advertisement

Advertisement