परळी : बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना तालुक्यात उघडकीस आली आहे. चुलत भावाने दिव्यांग बहिणीवर बळजबरीने अत्याचार केला. ५ फेब्रुवारीची ही घटना असून आरोपी फरार आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ग्रामीण ठाणे हद्दीतील ३० वर्षीय पीडित तरुणी दिव्यांग आहे.५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता ती आपल्या घरी होती. यावेळी तिचा चुलतभाऊ घरात शिरला. त्याने सुरुवातीला तिची छेड काढली व नंतर बळजबरीने अत्याचार केला. यानंतर तो पसार झाला. पीडितेने घडला प्रकार कुटुंबाला सांगितला. त्यानंतर त्यांनी ग्रामीण ठाणे गाठून फिर्याद दिली. विनयभंग, बलात्कार प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून तपास सहायक निरीक्षक प्रताप नवघरे करत आहेत.
बातमी शेअर करा