अंबाजोगाई दि.१४(प्रतिनिधी): शहरातील हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली आहे. हर्ष संतोष लखेरा ( २१ वय) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अंबाजोगाई शहरातील हनुमान नगर येथील हर्ष लखेरा याने आपल्या राहत्या घरी शनिवारी पहाटे २ च्या सुमारास गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
बातमी शेअर करा

