Advertisement

 भरदिवसा महिलेचे दागिने लंपास

प्रजापत्र | Friday, 13/03/2026
बातमी शेअर करा

गेवराई दि.१३ (प्रतिनिधी): तालुक्यातील तलवाडा येथील रामनगर शिवारात दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून नेल्याची घटना सोमवार (दि.९) रोजी भरदिवसा घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

     गेवराई तालुक्यातील तलवाडा रामनगर येथील तुळसाबाई अंकुश सानप (वय ५०) ह्या त्यांच्या शेताजवळ असताना एका दुचाकीवरून दोन अनोळखी तरुण तिथे आले. त्यांनी काही समजण्याच्या आतच त्यांच्या गळ्यातील १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी मंगळसुत्र बळजबरीने हिसकावत पसार झाले.असून तुळसाबाई सानप यांच्या फिर्यादीवरून गुरुवार (दि.१२) रोजी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा  पुढील तपास पोह.देवकते हे करत आहेत.
 

Advertisement

Advertisement