Advertisement

पवनचक्की प्लांटवरून केबल चोरीला 

प्रजापत्र | Thursday, 22/01/2026
बातमी शेअर करा

 पाटोदा दि.२२(प्रतिनिधी):तालुक्यातील (Patoda)धनगर जवळका येथील पवनचक्की प्लांटवरून अज्ञात चोरट्यांनी २७ केबल असा एकूण ९,५०,००० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवार (दि.२०)रोजी घडली असून अज्ञात चार (Crime)चोरट्यांविरुद्ध पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
            पाटोदा (Patoda) तालुक्यातील धनगर जवळका शिवारातील  रेन्यु पावर कंपनीमध्ये डीजे-३ या पवनचक्की प्लान्टवर येथील कर्मचारी काम करत असताना मंगळवार (दि.२०)रोजी अज्ञात चार आरोपींनी येथील कर्मचाऱ्यांना हातपाय बांधून मारहाण करत पवनचक्की प्लान्टवरील तांब्याच्या ४० फूट लांबीचे एकूण २७ केबल अंदाजे किंमत ९,५०,००० रुपयांचा ऐवज लंपास घटना घडली असून संजय शंकर करपे (वय ४०) यांच्या फिर्यादीवरून बुधवार (दि.२१)रोजी पाटोदा पोलीस (Crime)ठाण्यात अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि श्री.पवार हे करत आहेत.  

Advertisement

Advertisement