गेवराई दि.१५ (प्रतिनिधी)-जिल्हयात गुटख्याची विक्री आणि तस्करी राजरोसपणे सुरु असताना गेवराईत मावा बनविणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.यावली ११ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शहरातील शानदार पान सेंटरवर पोलिसांनी जाऊन तपासणी मोहीम राबविली.यावेळी पोलिसांना गुटखा आणि मावा तयार करणाऱ्या वस्तू मिळून आल्या.त्यानुसार समीर मेहबूब शेख (वय-३९),अमजद जाफर शेख (वय-४१) या दोघांना ताब्यात घेतले.दोन्ही आरोपींनी पोलिसांना सुगंधित तंबूखा,सुपारी,चुना,मावा तयार करण्यासाठी लागणारे दोन मिस्कर आणि इतर वस्तू दिल्या. या कारवाईत एक कार आणि दुचाकी देखील जप्त करण्यात आली असून ११ लाख ९१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत,अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर,पोलीस उपाधीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार,सपोनि संतोष जंजाळ,राम खोत,हंबर्डे,जितेंद्र ओव्हाळ यांनी केली.

बातमी शेअर करा
