नाना पटोलेंची अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. काँग्रेसने शुक्रवारी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी नाना पटोले यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष पदी आपली निवड होणार याच खात्रीने गुरुवारी पटोले यांनी आपला विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संध्याकाळीच त्यांच्या नावाची घोषणा काँग्रेसकडून होणार हे निश्चित मानले जात होते. 24 तासानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठीनी यावर शिक्कामोर्तब केला.
बातमी शेअर करा