बीड दि.५ (प्रतिनिधी)-जिल्ह्यात मागील ११ महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग सुरु असून शुक्रवारी (दि.५) नव्या ३३ रुग्णांची भर पडली.आरोग्य विभागाच्या अहवालात ५०३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ३३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.यात बीड शहरातील सर्वाधिक रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना पॉझिटिव्हम रुग्णांमध्ये बीडमधील आकडा कमी अधिक प्रमाणात वाढत असल्याचे स्पष्ट होते.शुक्रवारी जिल्ह्यात ३३ रुग्ण पॉझिटिव्ह आले असताना त्यात बीडमधील सर्वाधिक २१ रुग्णांचा समावेश आहे.तर अंबाजोगाई ३,आष्टी २,धारूर १,गेवराई १,केज २,परळी २ आणि वडवणीत १ रुग्ण आढळून आला.दरम्यान यावेळी ३० रुग्णांनी कोरोनावर मात केली.
बातमी शेअर करा