Advertisement

अवैध गर्भलिंगनिदान करणारं रॅकेट उघडकीस

प्रजापत्र | Tuesday, 25/11/2025
बातमी शेअर करा

नाशिकमध्ये अवैध गंर्भलिंगनिदान करणारं रॅकेट उघडकीस आलेलं होतं. विशेष म्हणजे हे लोक चालत्या कारमध्येच सोनोग्राफी करुन गर्भवती मातेच्या पोटात मुलगा आहे की मुलगी, याची चाचणी करायचे. पोलिसांच्या वाहन तपासणीमध्ये हा प्रकार उघड झाला होता. या प्रकरणी सोनोग्राफी मशिनची विक्री करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल झाला आहे.

    कारमध्येच पोर्टेबल सोनोग्राफी यंत्राद्वारे गर्भलिंगनिदान होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. चाळीसगाव येथील डॉक्टर बाळासाहेब पाटील याच्यावर PCPNDT कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. इंदिरानगर पोलिसांच्या वाहन तपासणीत हा प्रकार आला उघडकीस आलेला होता.सोनोग्राफी यंत्राची विनापरवानगी विक्री केल्याबद्दल GE Healthcare ही कंपनीलाही सहआरोपी करण्यात आलेले आहे. पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र नाशिक पोलिसांकडून जप्त करण्यात आले होते. महापालिकेच्या चौकशीत कलम 3, 6, 18, 23, 25, 26, 29 अन्वये गुन्हा सिद्ध झाला आहे.या प्रकरणात आरोपी दोषी ठरल्यास डॉक्टरला पाच वर्षांपर्यंत शिक्षा व वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द होण्याची शक्यता आहे. आरोपी डॉक्टरविरोधात पुण्यातही तक्रार दाखल झालेली आहे. परवानगीशिवाय यंत्र विक्री व वाहतूक करत गुन्हेगारी केल्यानं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

 

Advertisement

Advertisement