केज दि .२२(प्रतिनिधी): शहरात एक धक्कादायक प्रकार घडला असून एका अल्पवयीन मुलीला एका तरुणाने कॉफी शॉपमध्ये नेवून तिच्यावर अत्याचार (Crime News) केल्याची घटना घडलीय. या तरुणाने गुरुवार (दि.२०) नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एका चौदा वर्षीय मुलीचे अपहरण (Beed Crime News) केले होते. यानंतर शहरातील एका कॉफी शॉपमध्ये घेवून जात तिच्यावर अत्याचार केले.
दरम्यान, हा प्रकार कुटूंबीयांना समाजताच त्यांनी तातडीने केज पोलीस ठाण्यात धाव घेते घडलेला प्रकार सांगितला. तक्रारीनुसार पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. तसेच या प्रकरणाचा तपास केज पोलीस करत आहे. मात्र या घटनेनंतर पोलिसांनी केज शहरातील कॉफी शॉपवर कारवाईचे सत्र सुरु केले आहे.
बातमी शेअर करा

