बीड-शहर पोलीस ठाणे हद्दीतील जुगार अड्डे, हवाला रॅकेटवर कारवाई केल्यानंतर डीवायएसपी पूजा पवार यांच्या पथकाने पेठ बीड भागातील अवैध धंद्याकडे आपला मोर्चा वळविला असून तीन जुगार अड्डयावर छापे मारण्यात आले आहेत. या कारवाईत पोलिसांनी ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तिघांवर गुन्हे दाखल केले.
पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका काही भागात सुरु असल्याची माहिती डीवायएसपी पूजा पवार यांच्या टीमला मिळाली होती. त्यानुसार रात्री ८. ३० च्या सुमारास तीन ठिकाणी छापे मारून हजारोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पेठ बीड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कळते.ही कारवाई सचिन आगलावे, श्री. औसरमल आदींनी केली. दरम्यान डीवायएसपी पूजा पवार यांच्या कारवायामुळे अवैध धंद्यावाल्यांचे धाबे मात्र दणाणले आहेत.
बातमी शेअर करा

