Advertisement

परळीत वाघोबाचे दर्शन ?

प्रजापत्र | Thursday, 04/02/2021
बातमी शेअर करा

परळी-तालुक्यातील मालेवाडी गावांमध्ये बुधवारी रात्री काही गावकऱ्यांना वाघाचे दर्शन झाल्याची चर्चा असून वन विभागाचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहे.रात्री उशिरा गावामध्ये वाघ आल्याच्या चर्चामुळे गावकऱ्यांनी संपूर्ण रात्र जागून काढली. 
                  परळी तालुक्यातील मालेवाडी शिवारात बुधवारी रात्री शेकोटी पेटवून बसलेल्या शेतकऱ्यांना अचानक वाघ दिसल्याची घटना रात्री ९.३० च्या सुमारास घडली. वालेवाडी हे गाव डोंगराळ भागात वसलेले आहे. कडाक्याची थंडी असल्याने काही जण शेकोटी पेटवून बसले असताना शेळ्यां बांधलेल्या ठिकाणाकडे वाघ जात असल्याचे आढळून आले. आरडाओरडा केल्यानंतर वाघ निघून गेला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.सरपंच भुराजी बदने यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली असून वन विभागाचे कर्मचारी प्राण्याच्या पायाचे ठसे घेण्यासाठी रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे.  दरम्यान सदरील प्राणी कोणता होता याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

 

 

Advertisement

Advertisement