Advertisement

परळीत घरगुती वादातून महिलेचा खून 

प्रजापत्र | Saturday, 13/09/2025
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ दि.१३ (प्रतिनिधी):तालुक्यातील डांबी येथील एका महिलेचा घरगुती वादातून खून झाल्याची घटना शुक्रवार (दि.१२) रोजी रात्री घडली असली असून आरोपीच्या शोधासाठी ग्रामीण पोलीसचे पथके रवाना झाले आहे. 

      बीड (Beed) जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून खुनाच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.परळी तालुक्यातील डांबी येथील शोभा तुकाराम मुंडे (वय ३५)   या महिलेचा घरगुती वादातून खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे सदरील घटना शुक्रवार (दि.१२) रोजी रात्री घडली असून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.आरोपीच्या शोधासाठी ग्रामीण पोलीसचे पथके रवाना झाले. 

Advertisement

Advertisement