पंढरपूर : यवतमाळनंतर आता पंढरपुरातही चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याचं समोर आलं आहे. लहान बाळाला पोलिओ लस देताना ड्रॉपसोबत प्लास्टिकचे झाकणही (नोझल) बाळाच्या पोटात गेले. बाळाची प्रकृती ठीक असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. बाळाची प्रकृती ठीक
पंढरपूर जिल्ह्यातील भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. पोलिओचे ड्रॉप पाजणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याची हलगर्जी उघड झाली आहे. संबंधित एक वर्षाच्या बाळाची आई रविवारी त्याला घेऊन पोलिओ बूथवर ड्रॉप देण्यासाठी आली होती. यावेळी लस देताना ड्रॉपसोबत प्लास्टिकचे झाकणही बाळाच्या पोटात गेले. उपचारासाठी बाळाला दवाखान्यात ऍडमिट केले असून बाळाची प्रकृती ठीक असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना नोटीस
भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना या प्रकरणी नोटीस देण्यात आली आहे. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित रेपाळ यांनी दिला. निष्काळजी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे.