मुंबई, 02 फेब्रुवारी : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे. शिवसेनेनं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत कृषी कायद्याविरोधात आक्रमक भूमिका मांडली आहे. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सीमेवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेणार आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून दिल्लीच्या सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना आज भेटणार असल्याची माहिती दिली आहे.
'महाविकास आघाडीने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहिले. शेतकऱ्यांची तडफड व अश्रू अस्वस्थ करणारे आहेत. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून आज गाझीपुर सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना भेटत आहे.
संजय राऊत आज दुपारी 1 वाजता दिल्ली शहराच्या सीमेवरील गाझीपुर परिसरातआंदोलनकर्ते शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचनेवरून संजय राऊत आंदोलनकर्ते शेतकर्यांची भेट घेणार आहेत.
बातमी शेअर करा