बीड-कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काल आठ दिवस शहर लॉकडाऊनचा निर्णय घेतला.गुरुवारी (दि.२) बाधितांच्या संपर्कातील १५८ थ्रोट स्वॅब आंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.सायंकाळपर्यंत या सर्वांचे अहवाल येतील अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली.
बीडमधून ७६,आष्टी १२,केज उपजिल्हा रुग्णालय १६,परळी ७,गेवराई १९,माजलगाव ३,अंबाजोगाईमधून २५ स्वॅब तपासणी गेले आहेत.
बातमी शेअर करा