विमानतळाचे खाजगीकरण सुरूच राहणार
दिल्ली: केंद्र सरकारने विमानतळाच्या खाजगीकरणाचा हाती घेतलेला कार्यक्रम यावर्षीही सुरूच राहणार असून देशातील आणखी काही प्रमुख विमानतळ व्य्वस्थापनासाठी खाजगी कंपन्यांच्या हाती दिले जाणार आहेत. विमानतळाच्या व्यवस्थापनात सुधारणा व्हाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सीतारामन म्हणाल्या
उज्वला योजनेची व्याप्ती वाढविणार
दिल्ली: देशात उज्वला योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून आणखी १ कोटी लोकांना या योजनेचा लाभ या आर्थिक वर्षात दिला जाणार आहे अशी अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. देशातील आणखी १०० शहरांमध्ये पाईपलाईन द्वारे गॅस दिला जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.
विमा कंपन्यांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांना पायघड्या
दिल्ली : विमा क्षेत्र संदर्भाने निर्मला सीतारामन यांनी अत्यंत महत्वाची घोषणा केली असून विदेशी गुंतवणूकदारांसाठी सरकारने पायघड्या घातल्या आहेत. सध्याची विमा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीची ४९ % इतकी असलेली मर्यादा आता थेट ७४ % पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांमुळे आता विदेशी कंपन्या देशात मोठ्याप्रमाणावर विमा जमवू शकणार आहेत.