Advertisement

जुगार अड्ड्यावर चकलांबा पोलिसांची कारवाई

प्रजापत्र | Tuesday, 24/06/2025
बातमी शेअर करा

 चकलांबा दि.२४ (प्रतिनिधी):चकलांबा (Chaklamba) पोलिसांना तरडगाव शिवारात जुगार अड्डा सुरु असल्याची मिळताच सोमवार (दि.२३) रोजी अड्ड्यावर कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेत ३ लाख ५८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

         चकलांबा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सपोनि संदीप संदीप पाटील हे सोमवारी रात्री कर्मचाऱ्यांसह गस्तीवर होते. तरडगाव शिवारात एका शेतात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सदरील ठिकाणी धाव घेतली. (Chaklamba police)पोलीस आल्याचे पाहून जुगाऱ्यांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी पाठलाग करुन सहा जणांना ताब्यात घेतले. यावेळी येथून चार दुचाकी, सहा मोबाईल, रोख रक्कम ४३ हजार ३०० असा एकूण ३ लाख ५८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहादेव यादव ढोणे रा.कासरवाडी ता.गेवराई, रामेश्वर तुळशीराम गाजरे रा. शेकटा ता. गेवराई, संपत शंकरराव खेडकर रा.चकलांबा ता. गेवराई, भागवत शिवराम शिरसाट रा. तरडगव्हाण ता. शिरूर कासार, बदाम हरिभाऊ महानोर रा. कसरवाडी ता. गेवराई, पांडुरंग शेषराव बिचकून रा. चकलांबा ता. गेवराई या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील परि पो उप नि पवनसिंग अंबरसिंग जंघाळे, पोशि. कैलास विठ्ठल खटाणे, किरण सुनील मिसाळ, प्रशांत कल्याण घोंगडे यांनी केली.

Advertisement

Advertisement