दिल्ली : निर्मला सीतारामन यांनी रेल्वे क्षेत्राला १ लाख १० हजार ५५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातून मोठ्याप्रमाणावर खर्च पायाभूत सुविधांवर केला जाणार आहे. राष्ट्रीय रेल्वे प्लॅन तयार करण्यात येणार असून ब्रॉडगेजचे सर्व मार्ग २०२३ पर्यंत विद्युतीकारणाने जोडले जाणार आहेत असेही सीतारामन म्हणाल्या. काही नवीन रेल्वे मार्ग हाती घेतले जातील तसेच मोठ्या महानगरातील मेट्रो रेल्वे प्रकल्प गतिमान केले जातील असे सीतारामन म्हणाल्या. नागपूर आणि नाशिक मेट्रोसाठी निधीची तरतूद करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
बातमी शेअर करा