Advertisement

भरधाव कारच्या धडकेत चौदा वर्षीय मुलाचा मृत्यु 

प्रजापत्र | Saturday, 21/06/2025
बातमी शेअर करा

 केज दि.२१(प्रतिनिधी): केज- अंबाजोगाई (Accident)रोडवर ढाकेफळ जवळ रोडच्या कडेला शेळ्या चारीत असलेल्या १४ वर्षीय मुलाला भरधाव कारने दिलेल्या धडकेत मुलाचा मृत्यु झाला आहे.

     अधिक माहिती अशी की,अंबाजोगाई कडून केज मार्गे (Beed)बीडच्या दिशेने जात असलेल्या एका भरधाव कार क्र. (एम पी- ०९/झेड जी- २८३७) वरील चालकाचे कार वरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला शेळ्या चारीत असलेला बाळू हरिदास काळे या चौदा वर्षाच्या मुलाला कारने शुक्रवार (दि.२०) रोजी दुपारी ३ च्या सुमारास जोराची धडक दिली.धडक दिल्यानंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन खड्ड्यात पलटी झाली. या कार मधून प्रवास (Accident)करणारे मध्यप्रदेश मधील इंदौर जिल्ह्यातील जितेंद्र रघुवंशी आणि हरिसिंग रघुवंशी दोघे जखमी झाले आहेत. दरम्यान अपघातात जोराचे धडक लागलेल्या बाळू हरिदास काळे या चौदा वर्षाच्या मुलास  रुग्णवाहिकेतून उपचारासाठी बीडच्या दिशेने घेऊन जात असताना  मृत्यु झाला. हरिसिंग रघुवंशी यांच्यावर बीड येथे उपचार करण्यात येत असून जितेंद्र रघुवंशी यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचारासाठी पाठविले आहे.

Advertisement

Advertisement