मुंबई :मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांना (Mansoon Rain) पूर्वमोसमी पावसाने झोडपून काढले आहे, मात्र अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. कोकण किनारपट्टी भागात ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहणार आहे त्यामुळे मच्छीमारांना आणि स्थानिक नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.
दोन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावली. कोकणासह (Mansoon Rain)राज्याच्या अनेक भागांना तर अक्षरशः झोडपून काढले. पुणे आणि मुंबईतही पावसाने थैमान घातले. परिसरात पावसाने विश्रांती घेतली.मात्र गुरुवारपासून आणखी तीन दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टी आणि अरबी समुद्राजवळ कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्याचा परिणाम मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्टासह विदर्भाती अनेक जिल्ह्यांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना २२ मे रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, बीड, (Beed)परभणी, नांदेड आणि जालना या जिल्ह्यांना २२ मे रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे.