परभणी : राज्यात बोगस शिक्षक भरतीचे प्रकरण गाजत असतानाच परभणीत अशाच बोगस शिक्षक भरतीने एका शिक्षकाचा बळी घेतलाय.श्री नरसिंह प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ३५ वर्षीय शिक्षक सोपान पालवे यांनी आत्महत्या केलीय. एक हृदयद्रावक अशी चिट्ठी लिहून ठेवत त्यांनी आपबिती सांगितली आहे. संस्थाचालकाने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी या चिठ्ठीत केला आहे. संस्थेने केलेली शिक्षक भरती बोगस असल्याचा गंभीर आरोपही या चिठ्ठीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे परभणीत मोठी खळबळ उडाली आहे. (Parbhani)
या चिठ्ठीत संस्थेचे सचिव यांनी भरतीसाठी २० लाख आणि त्यानंतर २०% वरून ६०% टप्पा अनुदानावर नियुक्ती करण्यासाठी ५ लाख रुपये घेतले परंतु तरीही त्यांना काही महिन्याचे वेतन देण्यात आले नाही तर ६०% साठी पैसे देऊनही काही महिन्याचा पगार २० %प्रमाणे काढला असल्याचा आरोप त्यांनी चिठ्ठीत केलाय. यामुळे अस्वस्थ झालेल्या व आर्थिक विवंचनेत सापडल्यानेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या प्रकरणात संस्थेचे सचिव बळवंत खळीकर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Parbhani Teacher Sucide)