कोल्हापुर: महापुरुषांच्या अवमान प्रकरणी कोल्हापुरातल्या कळंबा कारागृहात असलेल्या (Prashant Koratkar) प्रशांत कोरटकरची अखेर सुटका झाली आहे. जामीन होऊन दोन दिवस झाले तरी तो जेलमध्येच होता. सुट्ट्या संपल्याने त्याची शुक्रवार (दि.११) रोजी सुटका करण्यात आली. कोरटकरला पोलिस बंदोस्तामध्ये त्याच्या घरी सोडण्यात येणार आहे. यापूर्वी कोर्टात दाखल करताना त्याच्यावर दोनवेळा हल्ला झाला होता.
कोल्हापूर मधील कळंबा कारागृह बाहेर पडल्यानंतर (Prashant Koratkar) प्रशांत कोरटकरला पोलीस संरक्षण मिळणार असल्याची माहिती आहे. पोलीस संरक्षणात कोरटकरला जिल्ह्याबाहेर सोडले जाणार आहे. जुना राजवाडा पोलिसांनी अर्जावर सहमती दिली असून अत्यंत गोपनीय पद्धतीने कोरटकरला हलविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.साधारण तासाभरापूर्वी प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात कागदपत्रांची पूर्तता केली. न्यायालयाने दिलेली जामिनाची ऑर्डर, (Prashant Koratkar) जात मुचलक्याचे पैसे भरलेली कागदपत्रे, पोलिस संरक्षण मिळण्यासाठीचा अर्ज यासह अन्य कागदपत्र न्यायालयासमोर ठेवली. त्यानंतर जामिनाची ऑर्डर घेऊन कोरटकरचे सहाय्यक वकील जेल प्रशासनाकडे गेले. त्यानंतर कोरटकरची जामिनावर मुक्तता झाली.
पाच दिवसांची पोलीस कोठडी आणि दहा दिवसाच्या न्यायालयीन कोठडीनंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरडकरची जामिनावर मुक्तता केली आहे. मात्र जामीन मिळूनही दोन दिवस प्रशांत कोरटकरचा (Prashant Koratkar) मुक्काम कळंबा मध्यवर्ती कारागृहातच राहिला. शुक्रवारी सकाळी कोर्ट सुरू झाल्यानंतर कोरटकरच्या सुटकेची तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली. कोल्हापूर प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्याकडे अनामत रक्कम भरल्यानंतरच कळंबा कारागृहातून त्याची मुक्तता झाली.