Advertisement

 महात्मा फुले वाडा स्मारकाच्या कामाचा स्पीड शून्य

प्रजापत्र | Thursday, 10/04/2025
बातमी शेअर करा

पुणे : महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक (chhagan bhujbal) विस्तारासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येईल, स्मारकाची रचना आकर्षक आणि भव्य प्रकारची करावी असे अजित पवारांनी सांगितले होते. त्यानंतर पुणे महानगरपालिकेकडून कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु अजूनही कामाला सुरुवात झाली नाही. यावरून आमदार छगन भुजबळ यांनी महापालिका अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. महात्मा फुले वाड्याचे स्मारकाच्या (pune municipal) कामाचा स्पीड शून्य आहे. भुजबळ आणि महानगरपालिकांच्या (phule wada) अधिकाऱ्यावर नाराज व्यक्त केली. अनेक लोक तयार आहेत जागा द्यायला पण नुसते आता टोलवा टोलवी सुरू आहे, काही नाही झालं तर मला इथं आंदोलन करावं लागेल असा इशारा त्यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिला आहे. 

                   भुजबळ म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून  (chhagan bhujbal)लोक इथं येतात. शंकर दया शर्मा, शरद पवार यांच्यापासून कार्यक्रम होत आहेत. आम्ही गेले अनेक वर्षांपासून स्मारकासाठी जागा मागत आहोत. महात्मा फुले जयंती कार्यक्रम करत आहे. फक्त शंभर दोनशे कोटींचे काम आहे. फुलेवाड्याच्या आजूबाजूची जागा मोकळी झाली तर पार्किंगसाठी सभा घेण्यासाठी जागा होईल. आज कित्येक (phule wada) वर्षे आम्ही याच्यासाठी प्रयत्न करत आहोत. जागेबाबत अनेक गोष्टी येतात. रिझर्वेशन असेल नोटीस देणे असेल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हळूहळू सगळ करत आहोत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केलं. निधी देऊन काम करून घेऊ असं महानगरपालिकेला सांगितलं. त्या कामाचे 100 कोटी सुद्धा आले आहेत. मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची काम आहेत. त्यांनी इथल्या लोकांची संपर्क साधून बोलणं, विरोध आहे त्या लोकांची समजूत काढून काढावी. जागा मोकळी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करायला हवेत.  

Advertisement

Advertisement