पाथर्डी : मोहटे गावात सुरू (Pathardi) असलेल्या सप्ताहादरम्यान सोमवारी (दि. ७) रात्री अज्ञात चोरट्यांनी गावातील तीन घरे फोडून रोख रक्कम व सोने-चांदीचे दागिने असा एकूण दीड लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी मोहटे येथील शेतकरी भाऊसाहेब विठोबा दहिफळे (Crime)यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
(दि.७) एप्रिल सोमवार रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दहिफळे(Pathardi) कुटुंबातील सर्वजण घराला कुलूप लावून गावातील सप्ताहाच्या कीर्तनाला गेले होते. सव्वाअकराच्या सुमारास घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांच्या घरातील कपाटाची उचकापाचक करून चोरट्यांनी कपाटात ठेवलेली रोख रक्कम, सोन्याच्या अंगठ्या व चांदीचे चाळ चोरट्यांनी चोरून नेले होते. त्यानंतर ज्ञानदेव गोधाजी खाडे व गणेश ज्ञानदेव खाडे यांच्या घरांमध्येही(Crime) चोरी झाल्याचे समजले.
ज्ञानदेव खाडे यांच्या घरातून दहा हजार रुपये, चार भार चांदीचे जोडवे तर गणेश खाडे यांच्या घरातून पंधरा हजार रुपये, पाच ग्रॅम सोन्याची कर्णफुले, पाच भार चांदीचे चाळ असा सर्व मिळून दीड लाख रुपये रोख चोरीस गेले असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.