मुंबई : महाराष्ट्रातील महिलांसाठी लागू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थींच्या खात्यात ३० एप्रिल २०२५, अक्षय तृतीया च्या दिवशी जमा केला जाणार आहे. सरकारकडून यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली असून, अनेक महिलांना या हप्त्याची प्रतीक्षा होती.
राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी ही योजना जुलै २०२४ मध्ये सुरू केली होती. त्यानंतर दरमहा पात्र महिलांच्या खात्यात आर्थिक मदत जमा केली जाते. मात्र, अलीकडे झालेल्या पडताळणीमुळे काही महिला योजनेतून वगळण्यात आल्या आहेत. यामुळे एप्रिल (Ladki Bahin Yojana)महिन्यात लाभार्थ्यांची संख्या वाढेल की घटेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बातमी शेअर करा