Advertisement

‘ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा

प्रजापत्र | Saturday, 05/04/2025
बातमी शेअर करा

पुणे : शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या (mangeshkar hospital) हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका गर्भवती महिलेला जीव गमावावा लागला. पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐनवेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेला. वेळीच उपचार मिळाले असते तर जन्मताच दोन नवजात बाळांवर मातृछत्र गमावण्याची वेळ आली नसती, अशा शब्दांत दीनानाथ रुग्णालयाविरोधात संताप (Pune)व्यक्त केला जात आहे. रुग्णालयाच्या पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. अशात आज लहुजी शक्ती सेनेचे आंदोलकांनी दीनानाथ रुग्णालयासमोर आंदोलन केले. आंदोलकांपैकी काही जण रुग्णालयाच्या छतावर चढले. डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलकांनी खाली न उतरण्याची भूमिका दाखल स्पष्ट केली.

दरम्यान, रुग्णालयाने १० लाख मागितले होते का? याबाबत विचारले असता अधिकाऱ्यांनी उत्तर(mangeshkar hospital) देण्यास टाळाटाळ केली आहे. योग्य माहिती आपल्यापर्यंत लवकरच पोहोचवली जाईल असे त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे. रुग्णालयाच्या बाहेर विविध संघटना, पक्ष एकत्र येऊन आंदोलन करू लागले आहेत. हॉस्पिटलची जागा त्यांच्या ताब्यातून काढून घ्यावी. अधिकाऱ्यांना निलंबित करावे, रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाई कारवाई अशी मागणी (Pune)आंदोलकांकडून केली जात आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. अशी मागणीही आंदोलकांनी केली.
 

Advertisement

Advertisement