Advertisement

मानहानीच्या दाव्यात सामाजिक न्यायमंत्री दाखविणार 'तडजोडी' ची 'करुणा'

प्रजापत्र | Thursday, 28/01/2021
बातमी शेअर करा
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात महिले विरोधात दाखल केलेल्या मानहानीचा दाव्यात आता 'तडजोडी'ची  'करुणा ' दाखविण्याचा निर्णय राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे घेतला आहे. गुरुवारी दोन्ही पक्षांनी मध्यस्थांच्या मार्फत प्रकरण तडजोडीने मिटविण्यासाठी न्यायालयाने मंजुरी दिली.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर सदर महिलेच्या बहिणीशी आपले संबंध असून त्या संबंधातून आपल्याला दोन मुले असल्याचा खुलासा धनंजय मुंडे यांनी दिला होता. मात्र सदर  महिले विरोधात धनंजय मुंडे यांनी काही महिन्यापूर्वीच मानहानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणात उच्च न्यायालयाने सदर महिलेने धनंजय मुंडे यांच्या संदर्भाने काहीही साहित्य प्रसिद्ध करू नये असे अंतरिम आदेश दिले होते. या प्रकरणात गुरुवारी दोन्ही पक्षांना तडजोडीचा मार्ग वापरण्यास संमती देण्यात आली. त्यामुळे आता मानहानीच्या  प्रकरणात धनंजय मुंडे 'तडजोडी' ची करूणा दाखविणार असल्याचे चित्र आहे. '

Advertisement

Advertisement