Advertisement

चौथीच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

प्रजापत्र | Monday, 24/03/2025
बातमी शेअर करा

पुणे :शाळेकडे निघालेल्या एका अल्पवयीन मुलीवर(Pune crime) लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. खाऊच्या आमिषाने नराधमाने चौथीच्या विद्यार्थीनीवर अत्याचार केला. ही घटना वाघोलीमध्ये (दि.२४) सोमवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. पोलिसांनी २७ वर्षीय नराधमाला ताब्यात घेतलं आहे. सदरील मुलगी रस्त्यावर रडत उभी होती तेव्हा परिसरातील लोकांनी पोलिसांना फोन केला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

 

                पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Pune)पीडित विद्यार्थिनी ही वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिच्या कुटुंबासमवेत वास्तव्यास आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ती घरून शाळेत जाण्यासाठी निघाली होती. ज्या रस्त्याने जाते त्या रस्त्यावर पिठाची गिरणी आहे. आरोपी तरुण या पिठाच्या गिरणीत कामाला आहे. रोज ही मुलगी याच रस्त्याने शाळेत ये जा करत होती. तरुणाने सोमवारी संधी साधून तिच्यावर झडप मारली. जेव्हा ही चौथीची मुलगी शाळेत जाण्यासाठी निघाली तेव्हा आरोपीने तिला अडवले. खाऊ देण्याचं अमिष दाखवलं आणि काम करत (crime news)असलेल्या गिरणी परिसरात घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. काही वेळानंतर बाहेर आलेली ही विद्यार्थिनी रस्त्यावर उभी राहून रडत होती.

दरम्यान, स्थानिक लोकांनी हा संपूर्ण प्रकार पाहिला. रडत असलेल्या या मुलीला शांत केले आणि तिच्याकडे विचारणा केली असता तिने हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर काही नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून घडलेल्या सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

Advertisement