डी. डी. बनसोडे/केज
पुणे दि.२८ - राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढत असताना आता पावसाचा देखील इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह घाटमाथ्यावर पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत असल्याचं दिसून येत आहे. वेळीअवेळी पाऊस पडत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसताना पहायला मिळत आहे.सध्या बिहार आणि मराठवाड्याच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात हवामानात चढउतार होत असल्याचं दिसून येत आहे.
फेब्रुवारीत पावसाच्या शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली होती. सध्या देशातील काही राज्यांमध्ये पाऊस सुरु असून महाराष्ट्रालाही आता याचा फटका बसताना पहायला मिळतोय.
बातमी शेअर करा