Advertisement

नगरपंचायतीच्या विशेष सभेत एकमेकास मारहाण

प्रजापत्र | Friday, 14/03/2025
बातमी शेअर करा

वाशी दि.१४ (प्रतिनिधी):नगरपंचायतच्या विशेष सभेत सत्ताधारी नगरसेवकात सभेच्या चित्रीकरणावरून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी परस्पर तक्रारीवरून सात नगरसेवकांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
 नगराध्यक्ष विजयाबाई गायकवाड यांनी विशेष सभेचे आयोजन केले होते. सभा सुरू असताना या सभेचे भाजपचे नगरसेवक बळवंतराव कवडे मोबाईलद्वारे शूटिंग करत  होते. यावेळी बळवंतराव कवडे हे वाशी नगरपंचायतचे मुख्य अधिकारी सौ.कांबळे यांना जिल्हाधिकारी यांनी आपणास तोंडी सभेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग द्वारे आयोजन करण्याचे सांगितले होते. आपण का केले नाही असे विचारत होते यावेळी भाजपचे नगराध्यक्ष कृष्णा उर्फ राजू कवडे यांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला व सभेचे शूटिंग करू नको म्हणून बाचाबाची झाली. याचेच रूपांतर पुढे भाजपचे सत्ताधारी नगरसेवक एकमेकांना मारहाण करण्यात आली यावरून वाशी पोलीस स्टेशन येथे बळवंतराव कवडे यांच्या फिर्यादीवरून राजू  लहू कवडे, उपनगराध्यक्ष सुरेश कवडे,सुहास कवडे यांच्यावर (दि .१०) मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तर (दि.११) मार्च रोजी भागवत कवडे, बळवंत कवडे, विकास पवार, जुबेर अहमद काजी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे वाशी भाजपा नगरपंचायत एक हाती सत्ता असतानाही अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. तर वाशी शहरातील नागरिकांमध्ये नगर पंचायतच्या कामामुळे हा  वाद होत असल्याची चर्चा रंगली आहे
.

Advertisement

Advertisement