सोलापूर :मस्साजोगचे सरपंच संतोष (Beed)देशमुख यांना अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आली. (Solapur)त्याचे फोटो पाहिल्यानंतर अंगावर काटा उभा राहतो. महाराष्ट्रात वाढत्या क्रौर्याच्या घटना पाहिल्यावर मन सुन्न होऊन जातं. इतकी क्रूरता एखादा माणसात कशी येऊ शकते, असा सवाल उपस्थित होतो. बीडमधील घटना ताजी असताना माळशिरस तालुक्यातील एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माळशिरसमधील एका तरुणाची नग्न करून हत्या करण्यात आली.
बीडमधील मारहाणीच्या हत्येचा क्रूर पॅटर्न सोलापूर जिल्ह्यातील (Solapur crime)माळशिरसमध्ये येऊन पोहोचला आहे. माळशिरसमध्ये एका तरुणाला नग्न करून चटके देऊन त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या तरुणाच्या संपूर्ण पाठीवर सळईने चटके दिल्याच्या खूणा आहे. अख्ख्या पाठीवर एकही जागा नाही जिथं चटके दिलेले नाहीत. अनैतिक संबंधातून तरुणाची क्रूर हत्या झाल्याने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे.
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील आकाश अंकुश खुर्द पाटील या २८ वर्षीय तरुणाचा माळशिरस पिलीव रोडवरील वनविभागाच्या क्षेत्रात निवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. आकाशच्या मृतदेहावर अनेक गंभीर जखमा दिसून आल्या. त्याच्या पाठीवर आणि अंगावर लोखंडी सळइने चटके दिल्याचे डाग होते. मुलाची ती अवस्था पाहताच आकाशच्या वडिलांचा बांध सुटला. अद्याप आकाशची कोणी हत्या केली याबाबत माहिती मिळालेली नाही. दरम्यान आकाशच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. अनैतिक संबंध किंवा प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचा संशय आता याबाबत व्यक्त केला जात आहे.