गडचिरोली : शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही गेल्या काही महिन्यांपासून लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. बदलापूर येथील एका शाळेत चिमकुल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर राज्यभर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले होते. मात्र, अद्यापही शाळा व कॉलेजेसमध्ये अशा घटना घडत आहेत. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कुक्कामेटा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाकडून शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील मुख्याध्यापकाने चक्क तिसरी आणि पाचवीच्या शिकणाऱ्या मुलींसोबत लैंगिक चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी पोलिसांनी नराधम शिक्षकाला (Teacher) बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलींच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरून लाहेरी पोलिसांनी मुख्याध्यापकास अटक केली आहे.

बातमी शेअर करा