Advertisement

शंभर रुपयांच्या बदल्यात दोनशे देऊन लुबाडायचे.......!

प्रजापत्र | Wednesday, 27/01/2021
बातमी शेअर करा

डी. डी. बनसोडे / केज

मुंबई दि.२७ - मुंबईत बनावट, नकली नोटा छापणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे नकली नोटा छापणारे भामटे शंभर रुपयांच्या बदल्यात दोनशे रुपये देतो, असं सांगत लोकांना लुबाडायचे. त्यामुळे अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. याशिवाय कोणतीही नोट घेताना ती नोट खरी आहे की खोटी याची शाहनिशा करुनच खिशात टाका, असे आवाहन करण्यात येेेत आहे.

            मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅच यूनिट 7 च्या टीमने नकली नोटा छापणाऱ्यांविरोधात ही मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी प्रिंटरच्या साहाय्याने घरात नकली नोटा छापणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणी चारही मुख्य आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांना आरोपीच्या घरातून 35 लाख्यांच्या बनावट नोटा सापडल्या आहेत. पोलिसांनी सर्व बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

Advertisement

Advertisement